Wednesday, February 7, 2018

Followers कसे वाढवायचे?

सोशल मीडिया चॅनेल्स वरचे Followers कसे वाढवायचे?

प्रत्य्रेक माणसाकडे काही कौशल्य (skills) असतात, आपल्या आवडी असतात ज्यात माणूस प्राविण्य मिळवतो, किंवा त्याला त्यात प्राविण्य मिळवण्याची इच्छा असते, मग ते कुठल्याही  क्षेत्रात असुदे. आपल कौशल्य हेरून त्या क्षेत्रात सतत लिहत राहा, वाचत राहा किंवा त्या क्षेत्रातील व्यक्तींना follow करा.
 • Followers वाढवण्यासाठी तुम्ही आधी आपल्या नेटवर्कचा वापर करा , उदा. दुसऱ्यांच्या पोस्ट वर LIKE किंवा comment करून आपण त्यांना प्रतिसाद दिला की ते  सुद्धा आपल्या पोस्ट वर like किंवा comments करतील . ह्याला engagement म्हणतात. 
 • न चुकता quality कन्टेन्ट पोस्ट करणे 
 • Discussions मध्ये भाग घेणे 
 • बरेच सोशल मीडिया मार्केटिंग tools आहेत जे आपल्याला engagement वाढवण्यात मदत करतात. उदा. ट्रॅफिक exchangers. 
 • Hashtags # चा वापर नक्की करा जेणे करून लोकांना सर्च करताना तुमचं कन्टेन्ट लगेच सापडू शकतं. 
आपली जर का business प्रोफाइल असेल तरी ह्या वरील गोष्टी लक्ष्यात ठेवाव्यात.फेसबुक Business पेज कसे करावे आणि का ?

बरेच लोक गफलत करतात, ती अशी कि आपल्या पर्सनल प्रोफाइल वरून business चे प्रोमोशन करतात . मग त्या साठी फेक प्रोफाइल तयार करून त्या द्वारे आपला बिझनेस प्रमोट करतात. काही वेळेस अश्या प्रोफाइल्स ना फेसबुक security डिपार्टमेंट बॅन सुद्धा करतात किंवा त्यांचे पोस्टींग करण्याचे option बंद करून टाकतात.फेसबुक ची पर्सनल प्रोफाइल ही individual किंवा private असते जेणे करून ती आपल्या मित्र आणि परिवार मध्ये वापरू शकता. तुमची जर का company, brand, NGO, दुकान किंवा तुम्ही कुठली service provide करत असाल तर तुम्हाला Facebook, business pageच तयार करायला हवं , कारण त्याचे फायदे बरेच आहेत, जे तुम्हाला व्यक्तिगत प्रोफाइल मध्ये मिळत नाहीत. Business पेज तयार करण्यासाठी साठी तुम्हाला facebook, "create page" चे पार्याय देतो. खालील छायाचित्र पहा.तुम्ही जेव्हा आपल्या फेसबुक मध्ये login करता तेव्हा google chrome ब्राउजर वापरा. त्या मध्ये खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे option तुम्हाला दिसेल. "Create Page" वर क्लिक केले कि वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे पेज उघडेल .महत्वाची गोष्ट अशी कि तुम्ही ह्या दोन्ही वेगळ्या प्रोफाईल एकाच लॉगिन मधून वापरू शकता. 

Followers कसे वाढावावेत हे तर आपण वरती बघितले. फेसबुक बिझनेस  पेज तयार झाले की ते कसे सांभाळायचे (manage) करायचे , insights व analysis चा योग्य वापर कसा करावा, ह्या बद्दल सर्व माहिती पुढील पोस्ट मध्ये बघूया.

तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आपली प्रतिक्रिया नक्की कळवा, खाली comment करा.

अधिक माहिती साठी आणि पूर्ण सोशल मीडिया कॉन्सलटेशन साठी संपर्क करा +91-9820553788 पूर्ण सोशल मीडिया सर्विसेस साठी इथे क्लिक करा

Friday, December 8, 2017

सोशल मीडिया - सगळ्यांच्या फाद्यासाठी


सोशल मीडिया म्हणजे काय?

अगदी सोप्या भाषेत सांगायच म्हणजे समाजाच्या (लोकांच्या) हातातील एलेक्ट्रॉनिक माध्यम. तुम्ही हे माध्यम  पाहिजे तसे आणि हवं तस वापरु शकता, आणि वापरायला अगदी सोप्पं सुद्धा आहे, कारण आज सगळ्यांकडे smartphones आहेत. हा  smartphone आपले विचार आणि संदेश आपल्या नेटवर्क मधे लगेच आणि प्रभावीपणे पोचवू शकतो, मग ते ,छायाचित्र असो किवा एखादा वीडियो, जर का कन्टेन्ट चांगलं असेल तर तो वाइरल (viral) व्हायला वेळ लागत नाही. हो पण प्रेज़ेंटेशन आणि टाइमिंग, हे सगळ्यात महत्वाचे !सोशल मीडिया प्रमोशन म्हणजे काय?

जर तुम्हाला सोशल मीडीया वापरुन आपला व आपल्या व्यवसायचा फायदा करून घ्यायचा असेल तर शेवट पर्यंत नक्की वाचा. कारण सोशल मीडिया सारखे दुसरे प्रभावी आणि स्वस्त माध्यम आज उपलब्ध नाही.

एका वेळी बऱ्याच सोशल साईट्स वरती जेव्हा आपण  "कॅम्पेन " करतो आणि जेव्हा लोकं ती पोस्ट आपल्या नेटवर्क मध्ये शेयर करतात, आणि तेव्हा आपोआप आपल्या व्यवसायाचे प्रोमोशन होतं . हा सोशल मीडियाचा  सगळ्यात मोठा फायदा आहे जो कुठलाही अन्य मीडिया देऊ शकत नाही.

इथे तुमच्या पोस्टचे "शेल्फ लाईफ " सगळ्यात जास्त आहे, कारण ती पोस्ट तिथे कायमची राहणार आहे , जो पर्यंत ती  साईट अस्तित्वात आहे. म्हणजेच थोड्या "कॉस्ट" मध्ये जास्तीत जास्त लोकां पर्यंत आपण पोहोचू शकतो. म्हणूनच बऱ्याच NGO's आणि सरकारी संस्था आपलं बजेट सोशल मीडिया वर पूर्ण खर्च करतात.

हा सोशल मीडिया प्रोमोशनचा एक भाग झाला , त्यात आणखी बरेच पैलू आहेत ,  मेसेज पोस्ट करणे  ही  पहिली पायरी . आपण पुढच्या भागात सोशल मीडिया प्रोमोशनचे पुढील तपशील बघूया.सोशल मीडियाच का?

तुम्ही काही उत्तरं अगदी प्रामाणिक पणे  द्या
 • तुम्ही दिवसातून किती वेळा Facebook चेक करता?
 • किती  वेळा whatsapp मध्ये उगाच मेसेज आला का बघता 
वरील उत्तरं दिलीत की तुम्हाला आपोआप सोशल मीडिया चं  महत्व कळेल. मी फक्त दोनच सोशल नेटवर्किंग साईट्सची नावं घेतली,  अजून बऱ्याच सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत. कोणालाही इंट्रेस्ट नसताना तुम्ही उगाच आपल्या ट्रीप चा फोटो अपलोड करता, एयरपोर्ट चेकिन हमखास  करता. नंतर बघितले तर कळते की आपल्याला काहीच likes आले नाहीत कोणी कमेन्ट केली नाही. ज्या मित्रांचं किवा मैत्रिणीचं कमेन्ट यायला पाहिजे त्यांनी कमेन्ट केलच नाही. वेळ वाया गेला. ह्याचा अर्थ की तुम्ही कुठे तरी ती पोस्ट अपलोड करुन चुकलात. किंवा तो मेसेज बरोबर माणसांपर्यंत पोचला नाही.

हल्ली सगळ्यांच्या हातात स्मार्ट मोबाइल पोहोचला आहे, त्या बद्दल कुणाचे ही दुमत नसावे अगदी माझ्या मित्रांच्या आजोबांपासून ते छोट्या भाचवंडां पर्यंत सगळे फेसबुक वर दिसतात, तेव्हा आपण किंवा मोठ्या कंपन्या कशा मागे राहतील? त्या मुळे छोट्या व मोठ्या ब्रॅण्ड्सना त्यांचे ग्राहक टार्गेट करण्यास अगदी सोयीस्कर झालंय.

असं  कधी आपल्या बरोबर झाला आहे का ? की कधी तुम्ही कुठला तरी प्रॉडक्ट सर्च करताय आणि त्याच  प्रॉडक्ट ची ad तुम्हाला फेसबुक वर पण लगेच दिसायला लागली ? किंवा तुम्ही कुठल्या जुन्या मित्रांना भेटलात आणि फ्रेंड्स सजेशन मध्ये लगेच त्याचे नाव आले ?

सोशल मीडिया साईट्स  तुमची इत्यंभूत माहिती आपल्या  सर्वर मध्ये साठवून ठेवत असते. तुमची पूर्ण कुंडली त्यांच्या हातात असते, तुम्ही काय करता (Likes , Preferences , Groups ), कुठे जाता (location), तुमच्या आवडी निवडी काय आहेत, तुमच्या  फ्रेंड्स सर्कल मध्ये कोण आहे, इत्यादी . ही  सगळी माहिती सोशल मीडिया कंपन्या ब्रॅण्ड्सना विकतात. एक उदाहरण म्हणून google maps ची लिंक देत आहे ह्या वरून तुम्हाला अंदाज येईल की इंटरनेट कंपन्या तुम्हाला किती track करतात . आपल्या google id नी लॉगिन करा, लॉगिन केल्यावर तुम्हाला गूगलच सांगेल की तुम्ही  कुठल्या दिवशी कुठे कुठे गेला होतात.


म्हणूनच मोठे नावाजलेले brands आणि business सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करतात.

सोशल मीडिया प्रोमोशन - कसे काय ? (How to?)
 • कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचायचे? 
 • आपले फेसबुक LIKES आणि engagement कशी वाढवायची? 
 • Followers कसे वाढवायचे? 
 • आपले फेसबुक LIKES आणि engagement कशी वाढवायची?
 • Inquiry चे leads किंवा सेल्स मध्ये कसे convert करायचे?
 • सोशल मीडिया साईट्स आणि ऍप पासून कसे कमवायचे ?
अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे मी माझ्या पुढील ब्लॉग पोस्ट मध्ये देणार आहे

सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये "कॉस्ट टू लीड" फार कमी आहे, हे तर आत्ता पर्यंत तुम्ही जाणलेच असेल. तुम्ही ज्या जाहिराती साठी १०००० रुपये खर्च करीत होता, तीच जाहिरात जर अर्ध्या किमतीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही हे माध्यम का नाही वापरणार ? उदा . खालील चार्ट बघा

Parameter Newspaper Ad Banner/Poster  Television Internet Social Media 
Life of Ad/message 1 Day/week 1 -2 years 30 seconds 1 year  Permanent
Cost  25 k to 50 k  5k to 50 k  5 lakhs to 10 cr.  10 k to 50 k  Upto 10 k 
Reach  City/Region Local/Regional National Worldwide Worldwide


सोशल मीडिया तुमच्या हातात आहे. तुम्ही एकदा पोस्ट केलेला मेसेज, फोटो नंतर एडिट करू शकता व तो कायमचा तिथे राहतो. Website असेल तर तुम्हाला त्याच domain दर वर्षी renew करायला लागतं . इथे तुम्हाला फेसबुकच आठवण करून देत की तुम्ही मागच्या वर्षी ह्याच दिवशी कुठली पोस्ट केली होती. तीच पोस्ट तुम्ही परत करू शकता ती पण अगदी फुकट !!

शिवाय तुमच्या जवळचे groups, events, हे सारखं सजेशन्स मध्ये येत राहतं . अजून सुद्धा बरेच  सोशल नेटवर्क आहेत ज्यांचे वेगळे फायदे आहेत. Eg YouTube, Pinterest इ. शिवाय अश्या ही साईट्स /ऍप्स  आहेत ज्यापासून आपण पैसेही कमवू शकतो, नाही खरं वाटत ? आपण बघूया पुढच्या ब्लॉग पोस्ट मध्ये.

तेव्हा सोशल नेटवर्किंग मध्ये उगाच वेळ आणि बॅटरी वाया नको, त्याचा योग्य तो उपयोग करा आणि आपलं इंटरनेट नेटवर्किंग आपल्या व्यवसाय वृद्धी साठी सत्कारणी लावा.

अधिक माहिती साठी आणि पूर्ण सोशल मीडिया कन्सलटेशन साठी संपर्क करा +91-9820553788
पूर्ण सोशल मीडिया सर्विसेस साठी इथे क्लिक कराWednesday, May 20, 2009

Thank You for visiting my page.

I am marketing professional and a certified social media expert worked with India's top IT MNC's for over 16 years in various capacities. 

I have worked in the IT and KPO industries for more than 16 years in various roles. I am a


self-starter and have willingness to learn, have a “can-do” attitude; flexible and initiates changes; have a desire to succeed.

I am open to opportunities in the area of social media marketing or as an independent consultant in the field of social collaboration and branding, content creation and marketing, knowledge management, social media marketing, content management, business insights, inside sales on permanent basis. Open for independent consultant roles in start-up companies.


Currently working in the area of Knowledge Management.

What value I bring to the table?
 • Rich industry experience in various roles, working with international stakeholders
 • Entrepreneurship outlook
 • An attitude of never-say-die and focused approach in strategic initiative
How it can help your business?


 • Practical strategic ideas which can be executed with a plan.
 • Marketing and Problem solving approach which can get new business
 • Optimizing cost and processes to save time for enhanced business value
 • Initiate and strategise the Enterprise Social Collaboration practice 

You can go through some of my Blogs and articles mentioned below:
Currently working as a guest faculty in India's leading Engineering & Management college in Mumbai. I have extensive training and industry experience and looking forward to be a visiting faculty in the area of knowledge management and social media. 

I will be happy to connect.Visit my blogs or connect otherwise to share and help each other grow.  
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | Best Hostgator Coupon Code