Wednesday, November 2, 2022

तुम्ही विनामूल्य ऑनलाईन कसे शिकू शकता?

तुम्ही विनामूल्य ऑनलाईन कसे शिकू शकता? सर्टिफिकेट सहीत 

आपण मागील ब्लॉग पोस्ट मध्ये वाचल्या प्रमाणे Google ही एक अलीबाबा ची गुहा आहे, हे तर आपल्याला कळलेच असेल. आता पाहूया की आपण Google द्वारे विविध ऑनलाईन कोर्सेस कसे शिकू शकतो आणि त्यांची सर्टिफिकेट देखील मिळवू शकतो, ते देखील विनामूल्य. 



आपण जर का मागील ब्लॉग पोस्ट मिस केली असेल तर इथे क्लिक करा  - आपला व्यवसाय वाढवण्यासाठी गुगलचा प्रभावी वापर कसा करावा?

बरं, फक्त गूगलच नाही, बऱ्याच साईट आहेत ज्या तुम्हाला विनामूल्य शिकवू शकतात, Youtube, HBR, Coursera त्यातीलच. तुम्ही सर्टिफिकेट मिळवू शकता आणि काही साईट तर तुम्हाला जॉब साठी पण ट्रेन करून तुम्ही नोकरी मिळवू शकता. पण फक्त शिकण्याची जिद्द आणि थोडी मेहनत हवी. 


तर आता बघूया आपण विनामूल्य सर्टिफिकेट कसे मिळवायचे!

  1. आधी Google Digital Garage वर जा आणि आपल्या google अकाउंटनी sign-in  करा 
  2. तुम्हाला सगळे कोर्सेस दिसतील, डावीकडील मेनू मध्ये सर्टिफिकेशन शोध आणि free certificate निवडून तुम्हाला पाहिजे तो कोर्से पूर्ण करा. 

गूगलच नाही तर बाकीच्या अश्या अनेक विद्यापीठ, महाविद्यालयं, आणि शैक्षणिक संस्था आहेत ज्या तुम्हाला अगदी विनामूल्य शिकवतात. तुमच्या कडे हवी ती फक्त शिकण्याची आणि शिक्षणाची आवड आणि असे मार्ग इंटरनेटवर शोधण्याची कला. 

मी काही बोनस टिप्स व लिंक देत आहे ज्या तुमच्या उपयोगी येऊ शकतील. 

तुम्हाला माहिते का, की एक विद्यापीठ आहे - University of the People जिथे तुम्हाला सगळे कोर्सेस व डिग्र्या विनामूल्य दिल्या जातात? फक्त परीक्षेसाठी फी घेतली जाते. ह्या वर बरेच विडिओ आहेत तुम्ही शोधू शकता. 






हार्वर्ड विद्यापीठ विनामूल्य ऑनलाइन वर्ग देखील देते. कॉम्प्युटर सायन्सपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत. खाली 5 कोर्स पहा. 

  1. Introduction to Computer Science - तुम्हाला कॉम्प्युटर सायन्समध्ये रस असेल तर करा. 
  2. Introduction to Game Development - तुम्हाला व्हिडिओ गेम डेव्हलपमेंट आवडते का? क्लिक करा. 
  3. Web Programming with Python and JavaScript - Python सह वेब अॅप्सच्या design आणि implementation, अधिक खोलवर जा. 
  4. Mobile App Development with React Native - मोबाइल अॅप development. 
  5. Introduction to Artificial Intelligence with Python - Python मध्ये मशीन लर्निंग वापरायला शिका. 

मला आशा आहे की तुम्हाला या ब्लॉगवरून माहिती मिळाली असेल जी तुम्हाला आधी माहित नव्हती. ऑनलाइन शिक्षणाबद्दलचा तुमचा अनुभव कमेंट करा आणि अशा माहितीपूर्ण ब्लॉगसाठी मला फॉलो करा. 


🙏🙏

No comments: