आपला व्यवसाय वाढवण्यासाठी गुगलचा प्रभावी वापर कसा करावा?
Google हे अलीबाबाच्या गुहेसारखे आहे, तुम्हाला बरीच साधने, अॅप्स, विनामूल्य संसाधने मिळू शकतात ज्याचा वापर तुम्ही तुमची कंटेन्ट तयार करणे आणि व्यवसाय वाढवण्यासाठी करू शकता. तुम्हाला कल्पना देण्यासाठी, गुगलकडे किती टूल्स आणि उत्पादने आहेत जी तुम्ही याआधी ऐकली किंवा पाहिलीही नाहीत हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
गेलात ना चक्रावून?
आपण बाकीच्या अँप्स कडे नंतर बघू , आधी बघू कशा सहज पणे आपण आपला व्यावसाय google search मध्ये आणू शकतो.
व्यवसायाचे काही सगळ्यात महत्वाचे घटक काय असतात ?
- जागा - Location
- उत्पादने/सेवा - Products/Services
- व्यवसायाची माहिती - Business Details
- पुनरावलोकन - Reviews
तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल वरील सर्व माहिती गुगल बिझनेस पेजवर विनामूल्य पोस्ट करू शकता आणि हो FREE वेबसाइट देखील तयार करू शकता. ही वेबसाइट अतिशय मूलभूत वेबसाइट आहे. ही वेबसाइट "Good to have" आहे कारण ती Google शोध परिणामांमध्ये तुमच्या व्यवसायाचे नाव शोधण्याची शक्यता सुधारण्यात मदत करते.
कसे करायचे Google बिझनेस पेज ?
इथे क्लिक करा आणि आपल्या Google लॉगिनसह, आपली सर्व व्यवसाय माहिती भरायला सुरू करा. सर्व विचारलेली व्यवसाय माहिती अपडेट करणे सुरू करा, जसे व्यवसायाचे नाव, वर्णन, स्थान, श्रेणी इ. तुम्ही जितकी अधिक व विस्तृत माहिती प्रदान कराल तितकी तुमच्या व्यवसायासाठी Google शोध परिणामांमध्ये दिसणे फायदेशीर आहे.
सर्वात महत्वाचे असते तुमचे लोकेशन, तुमच्या व्यवसायाचा अचूक पत्ता टाकून तो नकाशावर (Google Maps) वर "पिन" करा. एकदा तुम्ही नकाशावर "पिन" केलात की तो सर्वांना Google Maps ऍप वर दाखवायला सुरु करेल. Google तुमच्या व्यवसाय लोकेशनचं व्हेरिफिकेशन साठी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर एक पोस्टकार्ड पाठवते.
एकदा कन्फर्म झाले की तुम्ही आपल्या सर्व सर्व्हिसेस, प्रोडक्ट, ऑफर्स, ई त्यावर अपडेट करू शकता.
आपल्या कस्टमर ना आपल्या व्यवसायाचे रिव्हियू व रेटिंग द्यायला सांगू शकता, ज्या मुळे तुमच्या व्यवसायाची विश्वासाहर्ता वाढते. तसेच तुम्ही Google Ads ची मदत घेऊन आपल्या विभागात, शहरात, राज्यात, देशात कुठे ही जाहिरात प्रसारित करू शकता.
अधिक माहिती साठी आणि पूर्ण सोशल मीडिया कॉन्सलटेशन साठी संपर्क करा +91-9820553788 पूर्ण सोशल मीडिया सर्विसेस साठी इथे क्लिक करा
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आपली प्रतिक्रिया नक्की कळवा, खाली comment करा.
No comments:
Post a Comment