सोशल लीसनिंग व आपला बिझनेस
आपण आधीच्या भागात बघितलं की सोशल सेलिंग म्हणजे काय? कसे प्रभावी पणे आपण सोशल मीडिया द्वारे आपले प्रॉडक्ट्स, आपला व्यवसाय व सर्विसेस लोकां पर्यंत पोचवू शकतो, ते ही अत्यंत कमी दरात. आता पाहूया सोशल मीडिया चा वेगळा पैंलू , सोशल लिसनिंग.
सोशल लिसनिंग म्हणजे नेमकं काय?
सोशल लिसनिंग अथवा सोशल मीडिया मॉनिटरिंग हा एक असा भाग आहे ज्या मध्ये आपल्या व्यवसायाचा पूर्ण सोशल प्रेसेन्स, ब्रॅण्डिंग आणि कॅम्पिंगन यावर काय प्रतिक्रिया (एंगेजमेंट) येत आहेत हे आपण जाणून घेऊ शकतो. संपूर्ण अनालिटिकस, तुमच्या प्रत्येक चॅनेल वरच्या अस्तित्वाचे अवलोकन ज्या मुळे आपल्या व्यवसायाचा ऑनलाईन पसारा कुठ पर्यंत पोचला आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे सगळं कळू शकतं.
सेल्स आणि मार्केटिंग चा एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे "लिसनिंग" किंवा ऐकणे, जाणणे , आपल्या कस्टमर्स ना काय हवं आहे? सध्या ट्रेण्ड काय आहे? आपले कस्टमर्स कुठल्या एका गोष्टी कडे आकर्षित होत आहेत आणि खरेदी करत आहेत, खरेदीचे पॅटर्न काय आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या अनालिटिकस द्वारे अचूक कळू शकतात.
सोशल लिसनिंग मध्ये तुमचा व्यवसायाचा ऑनलाईन प्रेझेन्स आणि त्यावर येणारी प्रत्येक एंगेजमेंट, येणारा प्रत्येक व्हिसिटर, हा व्हिसिटर कुठे कुठे क्लिक करतो आणि त्यांची इन्क्वायरी, त्याची पूर्ण माहिती - "का?", "कसं?" आणि "केव्हा?" ह्या सगळ्याच एक विश्लेषण म्हणजे सोशल लिसनिंग. ह्या सोशल लिसनिंग विश्लेषणाचा कसा उपयोग करून तुमचा सेल वाढवता हेय आपण आता बघूया.
सोशल लिसनिंगमध्ये आणखीन एक महत्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे ORM (ऑनलाईन रेप्युटेशन मॅनॅजमेन्ट)

O.R.M. (Online Reputation Management) ऑनलाईन रेप्युटेशन मॅनॅजमेन्ट म्हणजे काय ?
ओ. आर. एम. (O.R.M.) म्हणजे आपल्या वैयक्तीक किंवा व्यवसायाची ऑनलाईन जगात काय प्रतिमा आहे व त्याचे व्यवस्थापन. ही सार्वजनिक प्रतिमा बघून आपले ग्राहक आपली मतं बनवत असतात. म्हणूनच प्रत्येक व्यवसायाचे जसे प्राथमीक कर्तव्य आहे की आपल्या ग्राहकांना उत्तम प्रॉडक्ट्स किंवा सुविधा पुरवणे, त्याच बरोबर ऑनलाईन विश्वात आपल्या व्यवसाया बद्दल कोण काय बोलतंय , कोण टीका करत आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. कोणाची टीका तर आपण थांबू शकत नाही, तरी पण त्या टीके पासून आपण काय शिकतो आणि असं करणाऱ्याला कसं कायमच्या ग्राहकामध्ये रूपांतरित करतो हे महत्वाचे आहे.
बरेच वेळेला कित्येक व्यवसाय आपलं बिझनेस पेज वेगवेगळ्या सोशल चॅनेल वर बनवतात, पण त्यावर आलेली चौकशी, ग्राहकांच्या प्रश्नाला उत्तर देत नाहीत, किंबहुना त्यांना कसं उत्तर द्यायचे हेच माहित नसते. ह्या मुळे व्यवसायाचा "potential" ग्राहक तुटतो आणि तुमच्या प्रॉडक्ट /सर्विस मध्ये त्यांचे स्वारस्य (interest) रहात नाही.
हा नियम कस्टमर एक्सपेरियन्सला (CX) ही लागू होते, जे आजकाल संपूर्ण ऑनलाईन असते. फार क्वचित आमने-सामने (face to face) होते.
वरील इन्फोग्राफीक बघितल्यावर लक्ष्यात येतं की आजची पिढी कस्टमर सर्विसला कॉल करायच्या फंद्यात पडत नाही. तुमच्या सोशल चॅनेल वर पहिली तक्रार येते, नंतर आपल्या पूर्ण नेटवर्कला सांगणार की तुमची सर्विस किती वाईट आहे, त्यातून तुम्ही त्यांची तक्रार उत्तम रित्या सोडवून दिली तर फक्त ४८% कस्टमर्स आपला अनुभव आपल्या नेटवर्क सह शेयर करतील. तेव्हा आपल्या व्यवसायाचे ऑनलाईन रेप्युटेशन तितकेच चांगलं असायला हवं जितकी समाजातील आपली प्रतिमा. तक्रारी हाताळण्यासाठी ही सोशल मीडिया टीम असते आणि त्यांना एक "प्रोसेस फॉलॉ " करावा लागतो.
O.R.M. व्यवस्थित करण्यासाठी बरेच ऑनलाईन टूल्स उपलब्ध आहेत जसे की - google alerts, social mention ई.
व्यवसायाची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी आणखीन एक महत्वाचा विषय म्हणजे Influencer Marketing (इन्फ्लुएन्सर मार्केटिंग). मोठे आणि छोटे ब्रॅंड्स छोट्या बऱ्याच इन्फ्लुएन्सर्स ना काही कॅम्पेन चालवायला देतात ज्या मुळे ब्रॅण्ड्स ची प्रतिमा तर चांगली राहतेच पण इन्फ्लुएन्सर्स च्या प्रसार करण्याच्या क्षमतेमुळे लाखो लोकांपर्यंत व्यवसायाचा प्रसार होतो. ते कसं? आणि आपल्या व्यवसायाला त्याचा फायदा कसा करून घ्यावा हे पुढील भागात पाहूया.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटलं हे नक्की कळवा. काही प्रश्न असतील तर खाली कंमेंट मध्ये पोस्ट करा अथवा कॉन्टॅक्ट करा.
अधिक माहिती साठी आणि पूर्ण सोशल मीडिया कॉन्सलटेशन साठी संपर्क करा +91-9820553788 पूर्ण सोशल मीडिया सर्विसेस साठी इथे क्लिक करा

No comments:
Post a Comment