इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे काय ?
इन्फ्लुएन्सर ही अशी व्यक्ती असते जीचा समाजावर बराच प्रभाव असतो. मार्केटिंग इन्फ्लुएन्सर म्हणजे असे व्यक्तिमत्व, ज्याचा प्रभाव किंवा फॉलोवर्स चा उपयोग करून कुठलाही व्यवसाय आपलं उत्पादन व सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून आपली विक्री वाढवू शकतात. तुम्हाला जर का आपल्या व्यवसायाचा कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं असेल तर शेवट पर्यंत नक्की वाचा.
प्रत्येक व्यक्तीच्या काही खुबी असतात आणि अद्वितीय (unique) व्यक्तिमत्व असते. आवडी प्रमाणे प्रत्येक माणूस आपल्या क्षेत्रात अनुभव आणि प्राविण्य मिळवत असतो. पण, ही बऱ्याच वर्षाची तपश्चर्या आहे, सातत्याने आपले काम, विचार आणि आपल्या क्षेत्रात लिहीत असाल तर तुम्ही इन्फ्लुएन्सर बनू शकता. थोड्क्यात तुम्ही 'कन्टेन्ट क्रियेटर' बनून जेव्हा आपले काम वेगवेगळ्या सोशल चॅनेल वर प्रोमोट (शेयर) करता आणि तुम्ही फॉलोवर्स जोडत जाता, तेव्हा तुम्ही स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणवून घेऊ शकता.

क्लीक
इन्फ्लूएंसर मार्केटिंग हा मार्केटिंगचा एक प्रकार आहे, जो प्रभावशाली लोकांवर केंद्रित केला जातो. ही प्रभावशाली लोकं आपापल्या क्षेत्रात फक्त मात्तबरच नाही तर अश्या लोकांचे हजारो अनुयायी सोशल मीडिया वर असतात, जे सतत त्यांचे (इन्फ्लुएन्सरचे) काही बाबतीत अनुकरण करीत असतात. उदा. विराट कोहली,आज सगळ्यात टॉप चा इन्फ्लुएन्सर आहे. त्याचे फक्त इंस्टाग्राम वर ३३ दशलक्ष पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. लाखोंच्या संख्येने युवा, विराटचा दैनंदिन कार्यक्रम फॉलो करीत असतात. एका इंस्टाग्राम पोस्ट साठी, एका ट्विट साठी, विराट करोडो रुपये घेतो. Google, American Tourister, Manyavar सारखे टॉपचे ब्रॅण्ड्स विराटला करारबद्ध करण्यास उत्सुक असतात ते त्याच्या 'ब्रँड ईमेज' आणि फॉलोवर्स मुळे.
अशा प्रमाणे, ज्या इन्फ्लुएन्सर्सचे हजारो आणि लाखोंच्या संख्येने फॉलोवर असतात त्यांना आपण मायक्रो-इन्फ्लुएन्सर्स म्हणतो. (तुम्ही उजवीकडील माझे इंस्टाग्राम हॅंडल पाहू शकता). अर्थात, कमी फॉलोवर्स छोट्या व्यवसायाला अनुरूप असतात आणि बऱ्याच छोट्या इन्फ्लुएन्सर चे एंगेजमेंट खुप चांगले असते. प्रत्येक मायक्रो इन्फ्लुएन्सर 'कंटेंट क्यूरेटर' असतो आणि त्यांचे एक विशिष्ठ स्थान व आपला एक निश (niche) असतो उदा. ट्रॅव्हल, लाइफस्टाइल, फूड, पॅरेंटिंग वगैरे.
नेमक्या ह्याच कारणा मुळे मोठे ब्रँड्स व छोट्या स्टार्टअप ना सुद्धा असे इन्फ्लुएन्सर हवे असतात, आपला संदेश कमीत कमी वेळात जास्तीत जास्त संबंधित लोकां पर्यंत पोचवायला असे इन्फ्लुएन्सर एक्दम चोख काम करतात, ते सुद्धा अगदी नगण्य किमतीत. काही चांगले इन्फ्लुएन्सर प्लॅटफॉर्म ची माहिती इथे वाचू शकता.
आता आपण बघूया की, इन्फ्लुएन्सरचा लोकांवर प्रभाव किती?
सोशल मीडियाच्या दृष्टीने कलाकार आणि ब्रँड ही दोन भिन्न व्यक्तिमत्व आहेत, दोघांच्या गरजा थोड्या वेगळ्या आहेत. तसं पाहता सोशल मीडिया हे एक सगळ्यात कॉस्ट इफेक्टिव्ह माध्यम आहे. पण मार्केटिंग चे नियम इथेही लागू होतात आणि ते म्हणजे जर का तुमची प्रॉडक्ट/सर्व्हिस चांगली नसेल तर कितीही मार्केटिंग ला जोर लावला तरी तुमचा बिझनेस तग धरू शकणार नाही.
कलाकार करतात ते लोकां पर्यंत पोचवायला "वर्ड ऑफ माऊथ" पब्लिसिटी जास्ती उपयोगी असते, ते त्यांच्या कामावर आणि कन्टेन्ट वर अवलंबून असते. मग तुमच्या सिनेमाला कितीही चांगले रिव्हिव मिळाले तरी लोक तुमचा सिनेमा बघायला पैसे खर्च करत नाहीत. उदा. शाहरुख खान चे मागील २ चित्रपट बघा, एका ही चित्रपटाने २ आठवडे सुद्धा तग धरला नाही. शाहरुख खानचे वेग-वेगळ्या सोशल चॅनेल्स वर २० कोटी हुन जास्त फॅन्स आहेत, तरी पण ही अवस्था, त्यामुळे नुसती स्टार पॉवर चालत नाही, काही तरी नवीन विषयाचा चांगला कन्टेन्ट लागतो.
ह्या उलट (प्रॉडक्ट) ब्रँड प्रोमोशन मध्ये अशी चूक झाली तर ती कधीही सुधारू शकतो. त्याला म्हणतात कस्टमर एक्सपीरियन्स (CX) किंवा आफ्टर सेल्स सर्विस. तुम्ही एक प्रॉडक्ट परत सुधारू शकता, एक चित्रपट किंवा नाटक/सीरिअल परत बनवून प्रदर्शित करू शकत नाही, त्या साठी कलाकारांना परत एक दर्जेदार कृती करावी लागते, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरायला.
ह्या दोघां मध्य एक साम्य असं आहे कि सोशल मीडिया चा वापर करून कलाकार आणि ब्रँड सतत आपल्या कस्टमर शी संपर्क ठेवून फीडबॅक घेऊ शकतात आणि प्रॉडक्ट मध्ये सुधारणा करून परत नव्याने भरारी घेऊ शकतात. ह्या साठी 'ड्रिप कॅम्पेन' हा उत्तम पर्याय ज्या मध्ये इन्फ्लुएन्सर हेरून त्यांना योग्य मोबदल्यात आपल्या व्यवसायाचा प्रसार करता येतो.
इंटरनेटचा फंडा सरळ आहे जितका जास्त ट्राफिक तेवढं जास्त मूल्य. तेव्हा आपल्या नेटवर्कचा पुरेपूर उपयोग करा. (वाचा फॉलोवर्स कसे वाढवायचे?) जर का तुम्ही आपल्या नेटवर्कचा वापर आपल्या व्यवसाय वृद्धी साठी करत नसाल तर तुम्ही आपला डेटा आणि वेळ फुकट घालवत आहात. आपल्या प्रत्येक पोस्ट, कॉमेंट, लाईक, रीव्हिव ला मुल्यांकित करा, कारण कन्टेन्ट राजा आहे (content is king) आणि डेटा ला मूल्य आहे.

सोशल मीडिया वरचे हे ब्लॉग्स तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील. अधिक माहिती साठी आणि पूर्ण इन्फ्लुएन्सर मार्केटिंग कन्सल्टेशन आणि प्रमोशन साठी संपर्क करा भ्रमणध्वनी +91-9820553788 पॅकेजेस साठी इथे क्लिक करा.
No comments:
Post a Comment