असं म्हटलं जायचं की आपल्या लोकांमध्ये आणि नात्या मधे बिझनेस करू नये कारण की संबंध बिघडतात आणि हवा तसा नफाही कमावता येत नाही .
पण ही झाली इंटरनेट आणि सोशल मीडिया येण्या अगोदरची गोष्ट , आत्ताच्या युगात सोशल सेलींगला केंद्र बिंदू ठेवून पूर्ण सोशल चॅनेल्स ची आखणी केली गेली आहे व मोठे ब्रँड्स तुमची माहिती , तुमच्या प्रत्येक क्लिक द्वारे मिळवत असतात. तो झाला "Data Privacy" चा भाग. आपण बघूया सोशल सेलिंग म्हणजे काय आणि कसे करायचे व त्याचे फायदे किती ?
सोशल सेलींग म्हणजे काय?
सोशल सेलिंग म्हणजे जेव्हा तुम्ही सोशल मिडियाचा वापर करुन आणि आपल्या नेटवर्कशी थेट संवाद साधून विक्री करता. आपल्या ग्राहकांच्या संभाव्य प्रश्नांचे उत्तर देऊन आणि त्यांचे समाधान करता, ह्याला सोशल सेलींग म्हणतात.
मागील ब्लॉग पोस्ट मध्ये आपण आपल्या व्यवसायाला सोसिशल मीडिया किती फायद्याचे आहे ते बघितले असेलच, नसल्यास इथे क्लिक करा - सोशल मीडिया सगळ्यांच्या फायद्यासाठी
सोशल सेलींग म्हणजे काय?
सोशल सेलिंग म्हणजे जेव्हा तुम्ही सोशल मिडियाचा वापर करुन आणि आपल्या नेटवर्कशी थेट संवाद साधून विक्री करता. आपल्या ग्राहकांच्या संभाव्य प्रश्नांचे उत्तर देऊन आणि त्यांचे समाधान करता, ह्याला सोशल सेलींग म्हणतात.
मागील ब्लॉग पोस्ट मध्ये आपण आपल्या व्यवसायाला सोसिशल मीडिया किती फायद्याचे आहे ते बघितले असेलच, नसल्यास इथे क्लिक करा - सोशल मीडिया सगळ्यांच्या फायद्यासाठी
ह्या भागात आपण बघूया काही टिप्स, सोशल सेलींग च्या संधर्बात. तुम्ही हे तर मान्य कराल कि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्य आज कुठल्या ना कुठल्या सोशल मीडिया वापरात मग्न आहे, मग ते Facebook असो किंवा whatsapp, प्रत्येकाचा सोशल प्रेझेन्स आहे, घरातील आजोबां पासून ते शाळेतील लहान मुलां पर्यंत अगदी सगळे सर्रास सोशल मीडिया सतत वापरात असतात.
तुम्ही किती, कसे व कशासाठी सोशल मीडिया वापरता ते सगळं, तुमच्या प्रोफाईल सकट त्यांच्या साईट्स आणि सर्वर वर स्टोरे केलेलं असत. तुमचा प्रत्येक क्लिक, तुम्ही साईट वर किती वेळ काय बघितल, कुठल्या लिंक क्लिक केल्या, सगळी इत्यंभूत माहिती ह्या साईट कडे असते. ह्याला आपण डिजिटल फूटप्रिंट असं म्हणतो, हा जो "digital footprint" तयार झाला आहे, त्याचा वापर करून मोठ्या कंपन्या तुमच्या प्रेफरेन्स अनुसार तुम्हाला सतत प्रॉडक्ट्स किंवा सर्विसेस दाखवीत असतात.
तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की आपण कुठल्या तरी जुन्या मित्राला फोन करतो आणि भेटतो आणि लगेच Facebook तुम्हाला त्याच मित्राचं add friend suggestion येतं. किंवा तुम्ही कुठल्या तरी शॉपिंग साईट वर आवडलेला शर्ट बघत असता आणि तोच शर्ट तुम्हाला सगळ्या साईट वर दिसायला लागतो जसा काय तो तुमचा पिच्छा करतो आहे. ह्याला म्हणतात re-marketing !
तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की आपण कुठल्या तरी जुन्या मित्राला फोन करतो आणि भेटतो आणि लगेच Facebook तुम्हाला त्याच मित्राचं add friend suggestion येतं. किंवा तुम्ही कुठल्या तरी शॉपिंग साईट वर आवडलेला शर्ट बघत असता आणि तोच शर्ट तुम्हाला सगळ्या साईट वर दिसायला लागतो जसा काय तो तुमचा पिच्छा करतो आहे. ह्याला म्हणतात re-marketing !
सोशल मीडिया वर प्रत्येक युजर काही ना काही अप्रत्यक्षरित्या "sell" करत असतो. उदा. आपली image, आपण किती सुखी आहोत, आपण किती फिरतो, आपली मुलगी किती हुशार आहे, आपल्याला किती बक्षिसं मिळाली किंवा अगदी प्रत्यक्षपणे कोणी mobile, accessories , कपडे, घर गाडी इत्यादी विकत असतात, तशी सरळ पोस्ट टाकतात. हे जरी सगळे करीत असले तरी प्रत्येकाला "sell" करणं जमत नाही . त्या साठी थोडा research, थोडा अनुभव आणि बराच अभ्यास त्या मागे असतो.
सोशल सेलींग मध्ये फक्त Facebook , Twitter, Instagram नव्हे. असे तब्बल १३० हुन अधिक सोशल मीडिया चॅनेल्स आहेत, जे आपापल्या परीने वेगवेगळी कामे करतात. शिवाय ब्लॉग्स, PR (प्रेस रिलीसेस), influencer marketing, recommendations (शिफारस), whatsapp वरील मेसेजेस, reviews, बिझनेस साईट लिस्टींग (B2B) आणि रेटिंग्स हे ही फार महत्वाचे दुवे आहेत. तुमच्या कडे जर बेसिक कन्टेन्ट असेल तर मग तुम्ही विनासायास सोशल मीडिया वरचे चॅनेल्स चालवू शकता.
दुसरे अगदी महत्वाच म्हणजे - डेटा. आजच्या युगात डेटा सर्वात महत्वाचा झाला आहे, जसे एकेकाळी पेट्रोल होते. तुमच Digital Footprint जेवढ जास्त आहे तेवढ अचूक ब्रॅण्ड्स तुम्हाला आपलं प्रॉडक्ट आणि सर्विस दाखवू आणि खपवू शकतात. अर्थात तेवढेच तुम्ही marketing influencer ही बनता. आता हे marketing influencer काय आहे हे आपण पुढील भागात पाहूया. त्या आधी खालील चार्ट पहा
तुम्हाला आता पटलं का थोडंसं ? नसेल पटलं तर खालील केस स्टडी पहा
कॅलिफोर्नियातील 'आय.टी.संपन्न' बे एरियात राहणारा भारतीय परिवार. चक्क मराठी. बाई स्वत: डॉक्टर आणि हा तिथल्या एका मोठया आय.टी. कंपनीत व्हाइस प्रेसिडेंट. घरी ही दोघं आणि यांची सोळा वर्षांची मुलगी. बस, इतकंच त्रिकोणी कुटुंब.
साधारण वर्षभरापूर्वी हा रागारागाने शेजारच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये भांडायला गेला. तिथल्या मॅनेजरला भेटला आणि तावातावाने सांगू लागला, ''हा काय चावटपणा लावलाय..? माझ्या घरी रोज तुमचे फ्लायर्स (पत्रकं) येतात. कशाचे? तर प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, बेबी केअर वगैरे विषयांवरच्या उत्पादनांचे. अरे, आमचा काय संबंध..? कशाला आम्हाला रोज रोज त्याच विषयांवरची फ्लायर्स पाठवून त्रास देताहात?''
मॅनेजर अनुभवी होता. त्याने याची समजूत घातली. चुकून झालं असेल असं म्हणाला आणि ''परत असे फ्लायर्स तुमच्या घरी येणार नाहीत'' असंही म्हणाला.
विषय इथेच संपायला पाहिजे होता.
पण ह्या घटनेच्या साधारण पाच-सहा महिन्यांनी हा त्याच शेजारच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मॅनेजरला पुन्हा भेटायला गेला. मात्र या वेळेस त्याच्या बोलण्यात भांडण्याची खुमखुमी नव्हती. सुदैवाने मॅनेजर तोच होता. त्याला पाच-सहा महिन्यांपूर्वीची ती घटना आठवत होती.
''वी आर सॉरी. पण 'तसले' फ्लायर्स तुमच्याकडे अजूनही येताहेत का? मी तर मागेच बंद करायला सांगितले होते.''
''नाही. फ्लायर्स तर बंद झालेत.'' हा म्हणाला, ''मी आलोय हे विचारायला, की तुम्हाला कसं कळलं..?''
''काय कसं कळलं?''
''हेच, की माझी मुलगी प्रेग्नंट होती, हे तुम्हाला कसं कळलं?''
मॅनेजर घाबरला. त्याला वाटलं की हा बाप्या आता आपल्याला आणि आपल्या स्टोअरला 'स्यू' करेल, आपल्यावर केस करेल, म्हणून तो काहीही सांगायला नकार देऊ लागला. वकिलांचं नाव घेऊ लागला. यावर हा म्हणाला, ''लिहून देतो की मला तुमच्यावर कसलीही लीगल ऍक्शन घ्यायची नाही. मला फक्त कुतूहल आहे, तुम्ही कसं ओळखलं ते!''
मग त्यांच्या डेटा प्रोसेसिंग युनिटच्या हेडशी ह्याची गाठ घालून देण्यात आली. त्या हेडने ह्याला सविस्तर समजावून सांगितलं. तो म्हणाला, ''तुमची मुलगी आमच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये नियमित येत असणार. आम्ही सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याच्या मदतीने त्या व्यक्तीचा चेहरा कॅप्चर करतो. तो चेहरा सोशल सिक्युरिटी नंबरच्या डेटाबेसबरोबर मिळवतो. त्यातून तुमच्या मुलीची आयडेंटिटी मिळाली असेल. तिने कधीतरी क्रेडिट कार्डने / डेबिट कार्डने काही विकत घेतलं असेल. त्यावरून तुमच्या मुलीची आयडेंटिटी आमच्या अल्गोरिदमने निश्चित केली असेल.
मग आता ही मुलगी ज्या शेल्फपाशी रेंगाळते, वस्तू बघते, ते सर्व आमचे कॅमेरे टिपतात. मुलीने त्या वस्तू विकत घेण्याची गरज नाही. पण माणूस तिथेच रेंगाळतो, जिथे त्याच्या आवडीच्या वस्तू असतात. आता लिपस्टिक आणि नेल पेंटच्या शेल्फपाशी तुम्ही रेंगाळाल का? किंवा बायका उगीचंच आफ्टर शेव्ह लोशनच्या आणि शेव्हिंग क्रीमच्या वस्तू हाताळत बसणार का? तर या सर्व गोष्टींवरून आमच्या सिस्टिममधले अल्गोरिदम्स त्या व्यक्तीची आवड-निवड शोधतात, त्या व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाउंटची पडताळणी करतात, त्यांच्या आवडीला, कुतूहलाला क्रॉसव्हेरिफाय करतात आणि सिस्टिमच त्यानुसार फ्लायर्स तयार करून त्यावर त्या व्यक्तीचा पत्ता प्रिंट करते. तुमच्या मुलीने प्रेग्नन्सी, चाइल्ड केअर वगैरेसारख्या वस्तूंमध्ये कुतूहल दाखवलं असेल.''
हा अक्षरश: अवाक!
लक्षात घ्या - बापाला नाही कळलं. डॉक्टर असलेल्या, एकाच घरात राहत असलेल्या, सख्ख्या आईलाही नाही कळलं की आपली मुलगी प्रेग्नंट आहे. अन् ते त्या डिपार्टमेंटल स्टोअरला कळलं!
ही आहे आजच्या सोशल मीडियाची कमाल, अशा प्रकारे तुम्ही आपल्या प्रोस्पेक्टिव्ह कस्टमर्स ची माहिती (data) गोळा करू शकता, ती कशी वापरायची, कधी वापरायची आणि कशी प्रेसेंट करायची ह्या साठी थोडा अभ्यास, थोर तर्क आणि बराच अनुभव गरजेचा आहे.
मला माहित आहे कि तुमच्या मनात बरेच प्रश्न असतील आणि आपल्या बिझनेस साठी सोशल मीडिया कसे वापरायचे हा विचार तुम्ही करत असाल.
अधिक माहिती साठी आणि पूर्ण सोशल मीडिया कॉन्सलटेशन साठी संपर्क करा +91-9820553788 पूर्ण सोशल मीडिया सर्विसेस साठी इथे क्लिक करा
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आपली प्रतिक्रिया नक्की कळवा, खाली comment करा.
अधिक माहिती साठी आणि पूर्ण सोशल मीडिया कॉन्सलटेशन साठी संपर्क करा +91-9820553788 पूर्ण सोशल मीडिया सर्विसेस साठी इथे क्लिक करा
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आपली प्रतिक्रिया नक्की कळवा, खाली comment करा.
No comments:
Post a Comment