नमस्कार मित्रांनो ,
मी ChatGPT आहे. मला OpenAI वर ट्रेन केलेल्या GPT-3.5 आर्किटेक्चर वर आधारित मी एक विशाल भाषा मॉडेल आहे. माझी नोंदवही 2021 ची आहे आणि आतापर्यंत मी जास्तीत जास्त डेटा वर ट्रेन केला गेलेलो आहे .
माझा उद्देश लोकांना अचूक उत्तरे देणे आहे. माझ्या ऍप च्या सहाय्याने तुम्ही विविध विषयांवर माहिती मिळवू शक्ता.
माझी एक विशेषता आहे जी मला अनेक भाषांमध्ये बोलण्याची क्षमता देते. तुमच्या पसंतीच्या भाषेत मला वाचू शकता आणि तुम्ही माझ्यासोबत तुमच्या मनात असणार्या कोणत्याही प्रश्नांचा उत्तर मिळवू शकता. माझ्या सहाय्याने तुम्ही पुढे जाऊ शकता. मी तुमच्या प्रश्नांचा उत्तर देण्यासाठी तयार आहे.
वरील मजकूर वाचून तुम्हाला असा लक्ष्यात आलं असेल की कोणीतरी एक रोबोट तुमच्याशी बोलत आहे आणि ते एका अर्थाने बरोबर देखील आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि ChatGPT मध्ये आपले स्वागत आहे.
ChatGPT नक्की काय आहे?
असा विचार करा की, तुम्ही जी आज पर्यंत कारकुनी कामं करत होतात जसं की मायक्रोसॉफ्ट एक्सेल चे फॉर्मूले, डिजाइन बनविणे, आर्टिकल किव्वा मजकूर लिहिणे ई., ज्या कामा साठी थोड्याफार प्रमाणात डोकं वापरून काम करावं लागतं ती सगळी कामे आता तुम्ही ChatGPT सारख्या AI साईट कडून करून घेऊ शकता. 😳
ChatGPT ही साईट नसून एक ChatBOT आहे जी OpenAI ह्या संस्थेने विकसित केली आहे ज्या मुळे ही पहिल्यांदा जेव्हा लाँच झाली (नोव्हेंबर 2022 मध्ये) तेव्हा सगळ्यांसाठी विनामूल्य होती.
ChatGPT चे फायदे काय आहेत ?
ChatGPT हे एक उत्कृष्ट भाषा मॉडेल आहे ज्याचे अगणित फायदे आहेत. या मॉडेलच्या प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत:
संचार: ChatGPT आपल्याला विविध भाषांमध्ये संचार करण्याची क्षमता देते. ही संचार क्षमता आपल्याला संपूर्ण जगावर बोलण्याची शक्यता देते जसे की इंग्रजी, मराठी, हिंदी आणि अन्य भाषांमध्ये.
शिक्षण: शिक्षणामध्ये ChatGPT अति उत्तम कामगिरी करू शकते. त्यामुळे आपण विविध विषयांवर माहिती मिळवू शकता जसे की इतिहास, विज्ञान, भूगोल आणि इतर अनेक विषय.
सहाय्य: ChatGPT आपल्याला विविध विषयांवर सहाय्य करू शकते, जसे की मेडिकल सल्ला, व्यवसाय सल्ला आणि इतर अनेक समस्यांवर समाधान.
वरील सर्व कामे जी पहिली माणसे करत होती, म्हणजे डिसाईन, कन्टेन्ट रायटिंग (लेखन), वकिली सल्ले अश्या सर्व गोष्टी हे AI करू शकतं. पण घाबरू नका, अजूनही हे बेसिक लेवल ला आहे. तुम्ही ह्यात आपले बरीचशी कामे पडताळून बघू शकता किंवा अंदाज घेऊ शकता.
तुम्हाला अचूक कामे करून घेण्यासाठी व उत्तरे मिळवण्यासाठी, अचूक प्रॉम्प्ट देणे गरजेचे आहे. ChatGPT सारखे अजून असंख्य GPT प्लॅटफॉर्म आहेत जे AI वर आधारित आहेत. तुम्ही इथे क्लिक करून त्यांची माहीतही घेऊ शकता.
AI टेकनॉलॉजि ची ही फक्त सुरुवात आहे आणि पुढे आणखीन काही मजेदार टूल /सॉफ्टवेर आले की नक्की कळवू .
तुम्ही आटा पर्यंत AI tools चा वापर केला का? हे नक्की कळवा, कंमेंट करा
No comments:
Post a Comment