Showing posts with label social media marketing. Show all posts
Showing posts with label social media marketing. Show all posts

Tuesday, October 19, 2021

टेलिग्राम - मार्केटिंग मध्ये पर्याय

अलीकडच्या काळात, व्हॉट्सअँप गोपनीयता धोरणाने (privacy policy)  बरेच मथळे बनवले. बरेच मेसेंजर युजर्सनी इतर वैयक्तिक संदेश (instant messenger) अॅप्सवर स्विच केले. या समस्येमुळे टेलिग्रामला खूप फायदा झाला, त्याचे वापरकर्ते 400 दशलक्ष+ पर्यंत वाढले. टेलिग्रामला ला  2022 पर्यंत 1 अब्ज वापरकर्त्यांना टार्गेट करण्याचे लक्ष्य आहे. 


टेलिग्राम हा व्हॉट्सअॅपपेक्षा एक अतिशय परस्परसंवादी आणि स्वयंचलित (automated) संदेशवाहक आहे. जर योग्य ज्ञानाचा वापर केला तर त्याचा तुमच्या व्यवसायाच्या जाहिरातींना फायदा होऊ शकतो आणि सोशल मीडिया मोहिमांना प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा प्रभावीपणे वापर केला जाऊ शकतो. त्याचा प्रभावी वापर कसा करता येईल ते आपण पाहू.

टेलिग्रामकडे 2 पर्याय आहेत जे आपण गट आणि चॅनेल तयार करू शकता (Groups & Channels) 


आपण व्हॉट्सअप ग्रुप वापरत असल्यास, आपण टेलिग्राम ग्रुपच्या मूलभूत गोष्टींशी परिचित असाल. टेलिग्राम अॅप असल्यास ग्रुप मध्ये प्रत्येकजण सहभागी होऊ शकतो. टेलीग्राम गट कोणालाही इतर टेलिग्राम वापरकर्त्यांना एकाच संभाषणात सामील होण्यासाठी आमंत्रित (invite) करण्याची परवानगी देतात ज्यात कोणीही सहभागी होऊ शकतो.

 पण, व्हॉट्सअॅप ग्रुपला काही बंधने आहेत, टेलिग्राम ग्रुपचं तसं नाही, हा फायदा आहे, टेलिग्राम ग्रुप मध्ये आपण जास्तीत जास्त 200,000 सदस्य जोडू शकतो! टेलीग्राम सार्वजनिक टेलिग्राम गट (open group) आणि खाजगी टेलीग्राम गट (Private group) दोन्ही ऑफर करते जे आपल्या गटाला योग्य आकारात ठेवण्यास मदत करतात. आता पाहू हे टेलिग्राम गट (खाजगी) वि. टेलिग्राम गट (सार्वजनिक) म्हणजे काय? 


टेलिग्राम चॅनेल म्हणजे काय?

टेलीग्राम चॅनेल हे आपले आशय सामायिक करण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी गट आहेत. हे फेसबुक ग्रुपसारखेच आहे, परंतु ते परस्परसंवादी नाही. सदस्य वाचू शकतात, मजकूर पुढे पाठवू शकतात, मतांमध्ये भाग घेऊ शकतात, परंतु ते त्यांच्यावर टिप्पणी देऊ शकत नाहीत. चॅनेल मालक मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ, ऑडिओ फायली, दस्तऐवज, लिंक्स सामायिक करू शकतात. टेलीग्राम चॅनेलच्या फायद्यांपैकी एक - चॅनेलमध्ये सामील होऊ शकणाऱ्या सदस्यांच्या संख्येसाठी कोणतीही मर्यादा नाही. उदाहरणार्थ, व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 200 फॉलोअर्सची मर्यादा आहे. टेलीग्रामवर, तुमचे कोट्यवधी अनुयायी सहजपणे असू शकतात. 

मी खाली टेलीग्राम वर काही सर्वोत्तम चॅनेल दिले आहेत 



टेलिग्राम ग्रुप म्हणजे काय?

टेलिग्राम गट हे गट गप्पा असतात जिथे प्रत्येक सदस्य संदेश, व्हिडिओ, प्रतिमा, फायली पाठवू शकतो. ग्राहकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, अभिप्राय मिळवणे आणि वापरकर्त्याने निर्माण केलेल्या सामग्रीला प्रोत्साहित करणे हे एक उत्तम साधन आहे.

डिजिटल टेलिग्राम मार्केटिंगचा एक भाग म्हणून बहुतेक व्यवसाय दोन किंवा तीन बाजूंचा दृष्टिकोन वापरतात. ते सामग्री सामायिक करण्यासाठी टेलीग्राम चॅनेल, ग्राहकांशी संलग्न होण्यासाठी गट आणि दळणवळण आणि विक्री प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी बॉट्स तयार करतात.

काही सर्वात उपयुक्त टेलिग्राम गट ज्यामध्ये तुम्ही सामील होऊ शकता 


आम्ही आमच्या पुढील ब्लॉग पोस्टमध्ये टेलीग्राम चॅनेल मार्केटिंगचे 10 फायदे पाहू. तुमच्या व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी तुम्हाला आणखी कोणती डिजिटल साधने शिकायला आवडतील? तुम्हाला हा ब्लॉग कसा उपयुक्त वाटला, कृपया आम्हाला खाली दिलेल्या टिप्पण्यांमध्ये तुमचा अभिप्राय सांगा.




Wednesday, May 1, 2019

इनफ्लुएंसर मार्केटिंग

इन्फ्लुएन्सर मार्केटिंग म्हणजे काय ?

इन्फ्लुएन्सर ही अशी व्यक्ती असते जीचा समाजावर बराच प्रभाव असतो. मार्केटिंग इन्फ्लुएन्सर म्हणजे असे व्यक्तिमत्व, ज्याचा प्रभाव किंवा फॉलोवर्स चा उपयोग करून कुठलाही व्यवसाय आपलं उत्पादन व सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून आपली विक्री वाढवू शकतात. तुम्हाला जर का आपल्या व्यवसायाचा कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं असेल तर शेवट पर्यंत नक्की वाचा.

प्रत्येक व्यक्तीच्या काही खुबी असतात आणि अद्वितीय (unique) व्यक्तिमत्व असते. आवडी प्रमाणे प्रत्येक माणूस आपल्या क्षेत्रात अनुभव आणि प्राविण्य मिळवत असतो. पण, ही बऱ्याच वर्षाची तपश्चर्या आहे, सातत्याने आपले काम, विचार आणि आपल्या क्षेत्रात लिहीत असाल तर तुम्ही इन्फ्लुएन्सर बनू शकता.  थोड्क्यात तुम्ही 'कन्टेन्ट क्रियेटर' बनून जेव्हा आपले काम वेगवेगळ्या सोशल चॅनेल वर प्रोमोट (शेयर) करता आणि तुम्ही फॉलोवर्स जोडत जाता, तेव्हा तुम्ही स्वतःला इन्फ्लुएन्सर म्हणवून घेऊ शकता.

क्लीक 


इन्फ्लूएंसर मार्केटिंग हा मार्केटिंगचा एक प्रकार आहे, जो प्रभावशाली लोकांवर केंद्रित केला जातो. ही प्रभावशाली लोकं आपापल्या क्षेत्रात फक्त मात्तबरच नाही तर अश्या लोकांचे हजारो अनुयायी सोशल मीडिया वर असतात, जे सतत त्यांचे (इन्फ्लुएन्सरचे) काही बाबतीत अनुकरण करीत असतात. उदा. विराट कोहली,आज सगळ्यात टॉप चा इन्फ्लुएन्सर आहे. त्याचे फक्त इंस्टाग्राम वर ३३ दशलक्ष पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. लाखोंच्या संख्येने युवा, विराटचा दैनंदिन कार्यक्रम फॉलो करीत असतात. एका इंस्टाग्राम पोस्ट साठी, एका ट्विट साठी, विराट करोडो रुपये घेतो. Google, American Tourister, Manyavar सारखे टॉपचे ब्रॅण्ड्स विराटला करारबद्ध करण्यास उत्सुक असतात ते त्याच्या 'ब्रँड ईमेज' आणि फॉलोवर्स मुळे.

अशा प्रमाणे, ज्या इन्फ्लुएन्सर्सचे हजारो आणि लाखोंच्या संख्येने फॉलोवर असतात त्यांना आपण मायक्रो-इन्फ्लुएन्सर्स म्हणतो. (तुम्ही उजवीकडील माझे इंस्टाग्राम हॅंडल पाहू शकता). अर्थात, कमी फॉलोवर्स छोट्या व्यवसायाला अनुरूप असतात आणि बऱ्याच छोट्या इन्फ्लुएन्सर चे एंगेजमेंट खुप चांगले असते. प्रत्येक मायक्रो इन्फ्लुएन्सर 'कंटेंट क्यूरेटर' असतो आणि त्यांचे एक विशिष्ठ स्थान व आपला एक निश (niche) असतो उदा. ट्रॅव्हल, लाइफस्टाइल, फूड, पॅरेंटिंग वगैरे.

नेमक्या ह्याच कारणा मुळे मोठे ब्रँड्स व छोट्या स्टार्टअप ना सुद्धा असे इन्फ्लुएन्सर हवे असतात, आपला संदेश कमीत कमी वेळात जास्तीत जास्त संबंधित लोकां पर्यंत पोचवायला असे इन्फ्लुएन्सर एक्दम चोख काम करतात, ते सुद्धा अगदी नगण्य किमतीत. काही चांगले इन्फ्लुएन्सर प्लॅटफॉर्म ची माहिती इथे वाचू शकता.

आता आपण बघूया की, इन्फ्लुएन्सरचा लोकांवर प्रभाव किती? 


सोशल मीडियाच्या दृष्टीने कलाकार आणि ब्रँड ही  दोन  भिन्न व्यक्तिमत्व आहेत, दोघांच्या गरजा थोड्या वेगळ्या आहेत. तसं पाहता सोशल मीडिया हे एक सगळ्यात कॉस्ट इफेक्टिव्ह माध्यम आहे. पण मार्केटिंग चे नियम इथेही लागू होतात आणि ते म्हणजे जर का तुमची प्रॉडक्ट/सर्व्हिस चांगली नसेल तर कितीही मार्केटिंग ला जोर लावला तरी तुमचा बिझनेस तग धरू शकणार नाही. 

कलाकार  करतात ते लोकां पर्यंत पोचवायला "वर्ड ऑफ माऊथ" पब्लिसिटी जास्ती उपयोगी असते, ते त्यांच्या कामावर आणि कन्टेन्ट वर अवलंबून असते. मग तुमच्या सिनेमाला कितीही चांगले रिव्हिव मिळाले तरी लोक तुमचा सिनेमा बघायला पैसे खर्च करत नाहीत. उदा. शाहरुख खान चे मागील २ चित्रपट बघा, एका ही चित्रपटाने २ आठवडे  सुद्धा तग धरला नाही. शाहरुख खानचे वेग-वेगळ्या सोशल चॅनेल्स वर २० कोटी हुन जास्त फॅन्स आहेत, तरी पण ही अवस्था, त्यामुळे नुसती स्टार पॉवर चालत नाही, काही तरी नवीन विषयाचा चांगला कन्टेन्ट लागतो.

ह्या उलट (प्रॉडक्ट) ब्रँड प्रोमोशन मध्ये अशी चूक झाली तर ती कधीही सुधारू शकतो. त्याला म्हणतात कस्टमर एक्सपीरियन्स (CX) किंवा आफ्टर सेल्स सर्विस. तुम्ही एक प्रॉडक्ट परत सुधारू शकता, एक चित्रपट किंवा नाटक/सीरिअल परत बनवून प्रदर्शित करू शकत नाही, त्या साठी कलाकारांना परत एक दर्जेदार कृती करावी लागते,  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरायला.


ह्या दोघां मध्य एक साम्य असं आहे कि सोशल मीडिया चा वापर करून कलाकार आणि ब्रँड सतत आपल्या कस्टमर शी संपर्क ठेवून फीडबॅक घेऊ शकतात आणि प्रॉडक्ट मध्ये सुधारणा  करून परत नव्याने भरारी घेऊ शकतात. ह्या साठी 'ड्रिप कॅम्पेन' हा उत्तम पर्याय ज्या मध्ये इन्फ्लुएन्सर हेरून त्यांना योग्य मोबदल्यात आपल्या व्यवसायाचा प्रसार करता येतो.

इंटरनेटचा फंडा सरळ आहे जितका जास्त ट्राफिक तेवढं जास्त मूल्य. तेव्हा आपल्या नेटवर्कचा पुरेपूर उपयोग करा. (वाचा फॉलोवर्स कसे वाढवायचे?) जर का तुम्ही आपल्या नेटवर्कचा वापर आपल्या व्यवसाय वृद्धी साठी करत नसाल तर तुम्ही आपला डेटा आणि वेळ फुकट घालवत आहात. आपल्या प्रत्येक पोस्ट, कॉमेंट, लाईक, रीव्हिव ला मुल्यांकित करा, कारण कन्टेन्ट राजा आहे (content is king) आणि डेटा ला मूल्य आहे. 

सोशल मीडिया वरचे हे ब्लॉग्स तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील. अधिक माहिती साठी आणि पूर्ण इन्फ्लुएन्सर मार्केटिंग कन्सल्टेशन आणि प्रमोशन साठी संपर्क करा भ्रमणध्वनी +91-9820553788 पॅकेजेस साठी इथे क्लिक करा





Saturday, June 23, 2018

सोशल सेलिंग व आपला बिझनेस

असं म्हटलं जायचं की आपल्या लोकांमध्ये आणि नात्या मधे बिझनेस करू नये कारण की संबंध बिघडतात आणि हवा तसा नफाही कमावता येत नाही .

पण ही  झाली इंटरनेट आणि सोशल मीडिया येण्या अगोदरची गोष्ट , आत्ताच्या युगात सोशल सेलींगला केंद्र बिंदू ठेवून पूर्ण सोशल चॅनेल्स ची आखणी केली गेली आहे व मोठे ब्रँड्स तुमची माहिती , तुमच्या प्रत्येक क्लिक द्वारे मिळवत असतात. तो झाला "Data Privacy" चा भाग. आपण बघूया सोशल सेलिंग म्हणजे काय आणि कसे  करायचे व त्याचे फायदे किती ?




सोशल सेलींग म्हणजे काय?

सोशल सेलिंग म्हणजे जेव्हा तुम्ही सोशल मिडियाचा वापर करुन आणि आपल्या नेटवर्कशी थेट संवाद साधून विक्री करता. आपल्या ग्राहकांच्या संभाव्य प्रश्नांचे उत्तर देऊन आणि त्यांचे समाधान करता, ह्याला सोशल सेलींग  म्हणतात.

मागील ब्लॉग पोस्ट मध्ये आपण आपल्या व्यवसायाला सोसिशल मीडिया किती फायद्याचे आहे ते बघितले असेलच, नसल्यास इथे क्लिक करा - सोशल मीडिया सगळ्यांच्या फायद्यासाठी  

ह्या भागात आपण बघूया काही टिप्स, सोशल सेलींग च्या संधर्बात. तुम्ही हे तर मान्य कराल कि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्य आज कुठल्या ना कुठल्या सोशल मीडिया वापरात मग्न आहे, मग ते Facebook असो किंवा whatsapp, प्रत्येकाचा सोशल प्रेझेन्स आहे, घरातील आजोबां पासून ते शाळेतील लहान मुलां पर्यंत अगदी सगळे सर्रास सोशल मीडिया सतत वापरात असतात.

तुम्ही किती, कसे व कशासाठी सोशल मीडिया वापरता ते सगळं, तुमच्या प्रोफाईल सकट त्यांच्या साईट्स आणि सर्वर वर स्टोरे केलेलं असत. तुमचा प्रत्येक क्लिक, तुम्ही साईट वर किती वेळ काय बघितल, कुठल्या लिंक क्लिक केल्या, सगळी इत्यंभूत माहिती ह्या साईट कडे असते. ह्याला आपण डिजिटल फूटप्रिंट असं म्हणतो, हा जो "digital footprint"  तयार झाला आहे, त्याचा वापर करून मोठ्या कंपन्या तुमच्या प्रेफरेन्स अनुसार तुम्हाला सतत प्रॉडक्ट्स किंवा सर्विसेस दाखवीत असतात.

तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की आपण कुठल्या तरी जुन्या मित्राला फोन करतो आणि भेटतो आणि  लगेच Facebook तुम्हाला त्याच मित्राचं add friend suggestion येतं. किंवा तुम्ही कुठल्या तरी शॉपिंग साईट वर आवडलेला शर्ट बघत असता आणि तोच शर्ट तुम्हाला सगळ्या साईट वर दिसायला लागतो जसा काय तो तुमचा पिच्छा करतो आहे. ह्याला म्हणतात re-marketing !

सोशल मीडिया वर प्रत्येक युजर काही ना काही अप्रत्यक्षरित्या "sell" करत असतो. उदा. आपली image, आपण किती सुखी आहोत, आपण किती फिरतो, आपली मुलगी किती हुशार आहे, आपल्याला किती बक्षिसं मिळाली किंवा अगदी प्रत्यक्षपणे कोणी  mobile, accessories , कपडे, घर गाडी इत्यादी विकत असतात, तशी  सरळ पोस्ट टाकतात. हे जरी सगळे करीत असले तरी प्रत्येकाला "sell" करणं जमत नाही . त्या साठी थोडा research, थोडा अनुभव आणि बराच अभ्यास त्या मागे असतो.



सोशल सेलींग मध्ये फक्त Facebook , Twitter, Instagram नव्हे. असे तब्बल १३० हुन अधिक सोशल मीडिया चॅनेल्स आहेत, जे आपापल्या परीने वेगवेगळी कामे करतात. शिवाय ब्लॉग्स, PR (प्रेस रिलीसेस), influencer marketing, recommendations (शिफारस), whatsapp वरील मेसेजेस, reviews, बिझनेस साईट लिस्टींग (B2B) आणि रेटिंग्स हे ही फार महत्वाचे दुवे आहेत. तुमच्या कडे जर बेसिक कन्टेन्ट असेल तर मग तुम्ही विनासायास सोशल मीडिया वरचे चॅनेल्स चालवू शकता. 

दुसरे अगदी महत्वाच म्हणजे - डेटा. आजच्या युगात डेटा सर्वात महत्वाचा झाला आहे, जसे एकेकाळी पेट्रोल होते. तुमच Digital Footprint जेवढ जास्त आहे तेवढ अचूक ब्रॅण्ड्स तुम्हाला आपलं प्रॉडक्ट आणि सर्विस दाखवू आणि  खपवू शकतात. अर्थात तेवढेच तुम्ही marketing influencer ही बनता. आता हे marketing influencer काय आहे हे आपण पुढील भागात पाहूया. त्या आधी खालील चार्ट पहा



तुम्हाला आता पटलं का थोडंसं ? नसेल पटलं तर खालील केस स्टडी पहा 

कॅलिफोर्नियातील 'आय.टी.संपन्न' बे एरियात राहणारा भारतीय परिवार. चक्क मराठी. बाई स्वत: डॉक्टर आणि हा तिथल्या एका मोठया आय.टी. कंपनीत व्हाइस प्रेसिडेंट. घरी ही दोघं आणि यांची सोळा वर्षांची मुलगी. बस, इतकंच त्रिकोणी कुटुंब.

साधारण वर्षभरापूर्वी हा रागारागाने शेजारच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये भांडायला गेला. तिथल्या मॅनेजरला भेटला आणि तावातावाने सांगू लागला, ''हा काय चावटपणा लावलाय..? माझ्या घरी रोज तुमचे फ्लायर्स (पत्रकं) येतात. कशाचे? तर प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, बेबी केअर वगैरे विषयांवरच्या उत्पादनांचे. अरे, आमचा काय संबंध..? कशाला आम्हाला रोज रोज त्याच विषयांवरची फ्लायर्स पाठवून त्रास देताहात?''

मॅनेजर अनुभवी होता. त्याने याची समजूत घातली. चुकून झालं असेल असं म्हणाला आणि ''परत असे फ्लायर्स तुमच्या घरी येणार नाहीत'' असंही म्हणाला.

विषय इथेच संपायला पाहिजे होता.

पण ह्या घटनेच्या साधारण पाच-सहा महिन्यांनी हा त्याच शेजारच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मॅनेजरला पुन्हा भेटायला गेला. मात्र या वेळेस त्याच्या बोलण्यात भांडण्याची खुमखुमी नव्हती. सुदैवाने मॅनेजर तोच होता. त्याला पाच-सहा महिन्यांपूर्वीची ती घटना आठवत होती.

''वी आर सॉरी. पण 'तसले' फ्लायर्स तुमच्याकडे अजूनही येताहेत का? मी तर मागेच बंद करायला सांगितले होते.''

''नाही. फ्लायर्स तर बंद झालेत.'' हा म्हणाला, ''मी आलोय हे विचारायला, की तुम्हाला कसं कळलं..?''

''काय कसं कळलं?''

''हेच, की माझी मुलगी प्रेग्नंट होती, हे तुम्हाला कसं कळलं?''

मॅनेजर घाबरला. त्याला वाटलं की हा बाप्या आता आपल्याला आणि आपल्या स्टोअरला 'स्यू' करेल, आपल्यावर केस करेल, म्हणून तो काहीही सांगायला नकार देऊ लागला. वकिलांचं नाव घेऊ लागला. यावर हा म्हणाला, ''लिहून देतो की मला तुमच्यावर कसलीही लीगल ऍक्शन घ्यायची नाही. मला फक्त कुतूहल आहे, तुम्ही कसं ओळखलं ते!''

मग त्यांच्या डेटा प्रोसेसिंग युनिटच्या हेडशी ह्याची गाठ घालून देण्यात आली. त्या हेडने ह्याला सविस्तर समजावून सांगितलं. तो म्हणाला, ''तुमची मुलगी आमच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये नियमित येत असणार. आम्ही सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याच्या मदतीने त्या व्यक्तीचा चेहरा कॅप्चर करतो. तो चेहरा सोशल सिक्युरिटी नंबरच्या डेटाबेसबरोबर मिळवतो. त्यातून तुमच्या मुलीची आयडेंटिटी मिळाली असेल. तिने कधीतरी क्रेडिट कार्डने / डेबिट कार्डने काही विकत घेतलं असेल. त्यावरून तुमच्या मुलीची आयडेंटिटी आमच्या अल्गोरिदमने निश्चित केली असेल.

मग आता ही मुलगी ज्या शेल्फपाशी रेंगाळते, वस्तू बघते, ते सर्व आमचे कॅमेरे टिपतात. मुलीने त्या वस्तू विकत घेण्याची गरज नाही. पण माणूस तिथेच रेंगाळतो, जिथे त्याच्या आवडीच्या वस्तू असतात. आता लिपस्टिक आणि नेल पेंटच्या शेल्फपाशी तुम्ही रेंगाळाल का? किंवा बायका उगीचंच आफ्टर शेव्ह लोशनच्या आणि शेव्हिंग क्रीमच्या वस्तू हाताळत बसणार का? तर या सर्व गोष्टींवरून आमच्या सिस्टिममधले अल्गोरिदम्स त्या व्यक्तीची आवड-निवड शोधतात, त्या व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाउंटची पडताळणी करतात, त्यांच्या आवडीला, कुतूहलाला क्रॉसव्हेरिफाय करतात आणि सिस्टिमच त्यानुसार फ्लायर्स तयार करून त्यावर त्या व्यक्तीचा पत्ता प्रिंट करते. तुमच्या मुलीने प्रेग्नन्सी, चाइल्ड केअर वगैरेसारख्या वस्तूंमध्ये कुतूहल दाखवलं असेल.''
हा अक्षरश: अवाक!

लक्षात घ्या - बापाला नाही कळलं. डॉक्टर असलेल्या, एकाच घरात राहत असलेल्या, सख्ख्या आईलाही नाही कळलं की आपली मुलगी प्रेग्नंट आहे. अन् ते त्या डिपार्टमेंटल स्टोअरला कळलं!

ही आहे आजच्या सोशल मीडियाची कमाल, अशा प्रकारे तुम्ही आपल्या प्रोस्पेक्टिव्ह कस्टमर्स ची माहिती (data) गोळा करू शकता, ती कशी वापरायची, कधी वापरायची आणि कशी प्रेसेंट करायची ह्या साठी थोडा अभ्यास, थोर तर्क आणि बराच अनुभव गरजेचा आहे. 

मला माहित आहे कि तुमच्या मनात बरेच प्रश्न असतील आणि आपल्या बिझनेस साठी सोशल मीडिया कसे  वापरायचे हा विचार तुम्ही करत असाल.

अधिक माहिती साठी आणि पूर्ण सोशल मीडिया कॉन्सलटेशन साठी संपर्क करा +91-9820553788 पूर्ण सोशल मीडिया सर्विसेस साठी इथे क्लिक करा

तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आपली प्रतिक्रिया नक्की कळवा, खाली comment करा.


Wednesday, February 7, 2018

Followers कसे वाढवायचे?

सोशल मीडिया चॅनेल्स वरचे Followers कसे वाढवायचे?  

प्रत्य्रेक माणसाकडे काही कौशल्य (skills) असतात, आपल्या आवडी असतात ज्यात माणूस प्राविण्य मिळवतो, किंवा त्याला त्यात प्राविण्य मिळवण्याची इच्छा असते, मग ते कुठल्याही  क्षेत्रात असुदे. आपल कौशल्य हेरून त्या क्षेत्रात सतत लिहत राहा, वाचत राहा किंवा त्या क्षेत्रातील व्यक्तींना follow करा.
  • Followers वाढवण्यासाठी तुम्ही आधी आपल्या नेटवर्कचा वापर करा , उदा. दुसऱ्यांच्या पोस्ट वर LIKE किंवा comment करून आपण त्यांना प्रतिसाद दिला की ते  सुद्धा आपल्या पोस्ट वर like किंवा comments करतील . ह्याला engagement म्हणतात. 
  • न चुकता quality कन्टेन्ट पोस्ट करणे 
  • Discussions मध्ये भाग घेणे 
  • बरेच सोशल मीडिया मार्केटिंग tools आहेत जे आपल्याला engagement वाढवण्यात मदत करतात. उदा. ट्रॅफिक exchangers. 
  • Hashtags # चा वापर नक्की करा जेणे करून लोकांना सर्च करताना तुमचं कन्टेन्ट लगेच सापडू शकतं. 
आपली जर का business प्रोफाइल असेल तरी ह्या वरील गोष्टी लक्ष्यात ठेवाव्यात.



Business Marketing India
Facebook group · 2,597 members
Join Group
This forum will give you an opportunity to reach wide audience in single post. We invite people and businesses outside India to promote their products/services in India...
फेसबुक Business पेज कसे करावे आणि का ?

बरेच लोक गफलत करतात, ती अशी कि आपल्या पर्सनल प्रोफाइल वरून business चे प्रोमोशन करतात . मग त्या साठी फेक प्रोफाइल तयार करून त्या द्वारे आपला बिझनेस प्रमोट करतात. काही वेळेस अश्या प्रोफाइल्स ना फेसबुक security डिपार्टमेंट बॅन सुद्धा करतात किंवा त्यांचे पोस्टींग करण्याचे option बंद करून टाकतात.



फेसबुक ची पर्सनल प्रोफाइल ही individual किंवा private असते जेणे करून ती आपल्या मित्र आणि परिवार मध्ये वापरू शकता. तुमची जर का company, brand, NGO, दुकान किंवा तुम्ही कुठली service provide करत असाल तर तुम्हाला Facebook, business pageच तयार करायला हवं , कारण त्याचे फायदे बरेच आहेत, जे तुम्हाला व्यक्तिगत प्रोफाइल मध्ये मिळत नाहीत. Business पेज तयार करण्यासाठी साठी तुम्हाला facebook, "create page" चे पार्याय देतो. खालील छायाचित्र पहा.



तुम्ही जेव्हा आपल्या फेसबुक मध्ये login करता तेव्हा google chrome ब्राउजर वापरा. त्या मध्ये खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे option तुम्हाला दिसेल. "Create Page" वर क्लिक केले कि वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे पेज उघडेल .



महत्वाची गोष्ट अशी कि तुम्ही ह्या दोन्ही वेगळ्या प्रोफाईल एकाच लॉगिन मधून वापरू शकता. 

Followers कसे वाढावावेत हे तर आपण वरती बघितले. फेसबुक बिझनेस  पेज तयार झाले की ते कसे सांभाळायचे (manage) करायचे , insights व analysis चा योग्य वापर कसा करावा, ह्या बद्दल सर्व माहिती पुढील पोस्ट मध्ये बघूया.

तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आपली प्रतिक्रिया नक्की कळवा, खाली comment करा.

अधिक माहिती साठी आणि पूर्ण सोशल मीडिया कॉन्सलटेशन साठी संपर्क करा +91-9820553788 पूर्ण सोशल मीडिया सर्विसेस साठी इथे क्लिक करा





Wednesday, May 20, 2009

Thank You for visiting my page.

I am marketing professional and a certified social media expert worked with India's top IT MNC's for over 16 years in various capacities. 

I have worked in the IT and KPO industries for more than 16 years in various roles. I am a


self-starter and have willingness to learn, have a “can-do” attitude; flexible and initiates changes; have a desire to succeed.

I am open to opportunities in the area of social media marketing or as an independent consultant in the field of social collaboration and branding, content creation and marketing, knowledge management, social media marketing, content management, business insights, inside sales on permanent basis. Open for independent consultant roles in start-up companies.


Currently working in the area of Knowledge Management.

What value I bring to the table?
  • Rich industry experience in various roles, working with international stakeholders
  • Entrepreneurship outlook
  • An attitude of never-say-die and focused approach in strategic initiative
How it can help your business?


  • Practical strategic ideas which can be executed with a plan.
  • Marketing and Problem solving approach which can get new business
  • Optimizing cost and processes to save time for enhanced business value
  • Initiate and strategise the Enterprise Social Collaboration practice 

You can go through some of my Blogs and articles mentioned below:




Currently working as a guest faculty in India's leading Engineering & Management college in Mumbai. I have extensive training and industry experience and looking forward to be a visiting faculty in the area of knowledge management and social media. 

I will be happy to connect.Visit my blogs or connect otherwise to share and help each other grow.